www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत गुरुवारी रात्री झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत तरुणीनीने दोघांना ओळखलं. दरम्यान, मुंबई पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. ओळखलेल्या पैकी दोघांची नावे रुपेश आणि जावेद असल्याचे पोलिसांकडून समजते.
पीडित तरूणी आणि तिच्या सहकारी मित्राने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रेही बनवली आणि ती प्रसिद्ध केलीत. दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रात्री उशीरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शक्तीमील कंपाऊड परिसरातील २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
पीडित तरुणी एका इंग्रजी मासिकात प्रशिक्षणार्थी पत्रकार असून ती तिच्या एका सहका-यासोबत शक्तीमिल परिसरात असाईमेंटवर गेली होती. तेथे त्यांना पाच अनोळखी तरूणांनी हटकले. पाच जणांपैकी दोघांनी तिच्यासोबत असलेल्या सहका-याला धमकी देत धरून ठेवले आणि उर्वरित तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची प्राथमिक चौकशीत माहिती मिळाल्याचे मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिली.
या प्रकाराची राज्य सरकारने गांभिर्याने दखल घेत बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी सुमारे १८ पोलीस पथके तयार केली होती. दरम्यान, पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. या पाचही जणांची ओळख पटली आहे. अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ