`सीएट`ची आग आटोक्यात; रेल्वे सेवेलाही फटका

नाहूरच्या सीएट टायर कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीत इथला रबर स्टॉक आगीत जळून खाक झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 24, 2014, 09:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाहूर
नाहूरच्या सीएट टायर कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीत इथला रबर स्टॉक आगीत जळून खाक झालाय.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदलाच्या तब्बल १६ गाड्या आणि नऊ टँकर्सना पाचारण करावं लागलं. अथक प्रयत्नांनंतर अखेर पहाटे साडेचारच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमनदलाला यश आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
आगीचा रेल्वेसेवेलाही फटका
नाहूर स्टेशनलगतच ही कंपनी असल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही या आगीचा फटका बसला. नाहूर रेल्वे स्टेशनवर लोकलला थांबा देण्यात आला नव्हता. अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक फास्टवर वळण्यात आली होती. मात्र, रात्री १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास ही वाहतूक पूर्ववत झाली होती. ही आग सध्या आटोक्यात आली असली तरी परिसरातले नागरिक धुराच्या त्रासानं हैराण झालेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.