www.24taas.com, मुंबई
मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरूस्तीवरून मनसे - शिवेसेना एकमेकांपुढे भिडली आहे. मनसेचे वर्चस्व असलेलेल्या परिसरातील चार उड्डाणपुलांच्या दुरूस्ती न करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर केल्याचा आरोप मनसे नगरसवेकांनी केलाय. महिन्याभरात हे उड्डाणपुल दुरूस्ती न केल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिलाय.
मुंबईतील 21 उड्डाणपुलांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव स्थाय़ी समितीत सादर करण्यात आला होता. स्थायी समितीच्या या प्रस्तावात दादर केशवसूत पूल,करीरोड पूल, कटरिया पूल, एलफिन्सटन पूल याचा समावेश नव्हता. हे चारही उड्डाणपुलांची दुरूस्ती शिवेसेने पालिका प्रशासनाच्या संगनमंतान मनसेचे वर्चस्व असलेलेल्या परिसरातील असल्यामुळे दुरूस्तीसाठी घेतले नसल्याचा आरोप मनसे नगरसवेकांनी केलायं.हे उड्डाणपुल दुरूस्त होऊ नये यासाठी सत्ताधा-यांनी अडवणूकीची भूमिका घेतल्याची टिका मनसेन केली आहे.
मनसेच्या आरोपाच पालिकेतील सत्ताधारी शिवसेना - भाजप युतीन खंडन करत.सदर चार उड्डाणपुलांच्या दुरूस्तीसाठी कंत्राटदारान निविदाच भरली नसल्यामुळे दुरूस्तीचा प्रस्ताव सादर केला नसल्याचा खुलासा पालिका सभागृह नेत्यांनी दिलाय. महिन्याभरात हे उड्डाणपुल दुरूस्ती न केल्यास मनसेन आंदोलनाचा इशारा दिलायं. दुरूस्तीतून उड्डाणपुल वगळल्याने मनसेचा शिवसेनेविरूध्द हल्लाबोल सुरू झालाय.त्यामुळे उड्डाणपुलांच्या दुरूस्तीवरून मनसे - शिवेसेना एकमेकांपुढे भिडली आहे.