www.24taas.com, मुंबई
वरळीमध्ये काल रात्री फेरारी आणि लेम्बोरगिनी या महगाड्या गाड्या वेगानं चालवल्या प्रकरणात दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एक कार मुंबई तर दुसरी कार झारखंड पासिंगची आहे.
वरळी परिसरात हे दोघं जण बेदरकारपणे वाहन चालवित होते. यावेळी स्थानिकांनी पोलीस कंट्रोल रुमकडं तक्रार केल्यानंतर या दोन्ही चालकांना अटक करण्यात आली.
रस्त्यांवर कार रेसींग करणे आणि चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवणे या प्रकरणामध्ये या दोघांना अटक करण्यात आली आहे. याआधीही हीट अँण्ड रनच्या अनेक केसेस मुंबईत घडल्या आहेत आणि त्यामुळे अनेक निरपराध्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील रस्त्यावर रात्रीच्या बऱ्याच वेळेस अशा बेदरकारपणे वाहने चालविले जातात.