मुंबई : 'खान्देश हित संग्राम' संघटनेतर्फे खडसे समर्थकांनी आज भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. खान्देशचा आवाज दडपण्याचा नेहमीच प्रयत्न करण्यात आला.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या खडसे यांना पक्षांतर्गत आणि बाहेरून पद्धतशीर प्रयत्न करत राजीनामा द्यायला भाग पडल्याचा आरोप खडसे समर्थकांनी यावेळी केला.
दरम्यान एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. भविष्यात पक्ष आपल्या पाठिशी राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
त्यामुळं समर्थकांनी राजीनामे न देता शांतता पाळून पक्षाच्या हितासाठी काम करण्याच्या सूचनाही त्य़ांनी दिल्या आहेत.