खडसे म्हणतात, खान्देशला हवंय मंत्रिपद

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख लांबल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी खानदेशला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी नंदुरबारमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे.

Updated: Nov 16, 2015, 09:57 AM IST
खडसे म्हणतात, खान्देशला हवंय मंत्रिपद title=

मुंबई : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख लांबल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी खानदेशला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी नंदुरबारमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे.

एकनाथ खडसे यांनी खान्देशला मंत्रिपदाची मागणी केल्याने, खान्देशात एकनाथ खडसे यांच्या जवळील कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

दुसरीकडे सर्वाधिक मंत्र्यांचा जिल्हा, असं म्हटल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याला, ६० वर्षानंतर पहिल्यांदा एकही मंत्रिपद नाही, म्हणून सांगलीत मंत्रिपद कुणाला मिळेल?, यावर सर्वांची नजर लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.