एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. सुनील पाटील आणि आनंदा पाटील या फेसबुकवर मित्रांनी चॅटिंग दरम्यान खडसेंना ही धमकी दिल्याचा आरोप होतोय. 

Updated: Feb 16, 2016, 12:55 PM IST
एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी title=

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. सुनील पाटील आणि आनंदा पाटील या फेसबुकवर मित्रांनी चॅटिंग दरम्यान खडसेंना ही धमकी दिल्याचा आरोप होतोय. 

याप्रकरणी भाजप कार्यकर्ता भारत महाजन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केलीय. 

भाजप आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ यांच्यासह खडसे समर्थकांनी दोषींवर त्वरीत कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस मुख्यालयात गोंधळ घातला. या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलंय.