पर्यटक उत्साहाच्या भरात घेतायत समुद्र पक्ष्यांचा जीव

सध्या थंडीच्या मौसमात बरेचसे परदेशी पक्षी हवापालटासाठी मुंबईत आलेत...  समुद्रात बोटींमधून फिरताना फ्लेमिंगो, सीगल, समुद्रपक्षी या पक्ष्यांचं सुंदर दर्शन घडतंय.... पण पर्यटक उत्साहाच्या भरात या पक्ष्यांना वाट्टेल ते खायला देताना दिसतायत. धक्कादायक म्हणजे, पर्यटकांकडून पक्ष्यांना कुरकुरे आणि वेफर्स खायला दिले जातायत.

Updated: Dec 27, 2014, 10:28 AM IST
पर्यटक उत्साहाच्या भरात घेतायत समुद्र पक्ष्यांचा जीव title=

मुंबई : सध्या थंडीच्या मौसमात बरेचसे परदेशी पक्षी हवापालटासाठी मुंबईत आलेत...  समुद्रात बोटींमधून फिरताना फ्लेमिंगो, सीगल, समुद्रपक्षी या पक्ष्यांचं सुंदर दर्शन घडतंय.... पण पर्यटक उत्साहाच्या भरात या पक्ष्यांना वाट्टेल ते खायला देताना दिसतायत. धक्कादायक म्हणजे, पर्यटकांकडून पक्ष्यांना कुरकुरे आणि वेफर्स खायला दिले जातायत.

पक्ष्यांसाठी हे पदार्थ अत्यंत घातक आहेत. त्यामुळे या पक्ष्यांचा मृत्यू होतोय, अशी पशू वैद्यकीय रुग्णालयाचे सेक्रेटरी डॉक्टर जे सी खन्ना यांनी माहिती दिलीय. 

अशा प्रकारे पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकल्यानं समुद्र पक्ष्यांची संख्या कमी झालेली दिसतेय. परदेशात अशाप्रकारे पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकायला बंदी आहे. तशी बंदी भारतातही घालण्याची मागणी होतेय.   
 
माणूस स्वतः जंक फूडच्या विळख्यात सापडलाय... आता पक्ष्यांचा जीव कुरकुरे आणि वेफर्स खायला देऊन घेऊ नका, असं आवाहन तज्ज्ञांनी केलीय. सध्या बरेचसे पर्यटक पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्यांवर गेले आहेत... या पर्यटकांना एकच सांगणं आहे... ते म्हणजे पर्यावरणाचंही भान राखणं गरजेचं बनलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.