महावीर जयंती निमित्तानं मासविक्री बंद ठेवण्याचं आवाहन

महावीर जयंती निमित्तानं आज कत्तलखाने तसंच मांसविक्री दुकानं स्वतःहून बंद ठेवण्याचं आवाहन, जैन आंतरराष्ट्रीय संघटनेनं केलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 9, 2017, 11:40 AM IST
महावीर जयंती निमित्तानं मासविक्री बंद ठेवण्याचं आवाहन title=

मुंबई : महावीर जयंती निमित्तानं आज कत्तलखाने तसंच मांसविक्री दुकानं स्वतःहून बंद ठेवण्याचं आवाहन, जैन आंतरराष्ट्रीय संघटनेनं केलंय. मांसविक्रेते संघटनेला जैन समाजानं पत्र लिहून हे आवाहन केलंय. जैन समाजाच्या भावनांचा आदर करत आज महावीर जयंती निमित्त, सर्व कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन यात करण्यात आलंय.

ब्रिटीश काळापासून महावीर जयंतीला देशातील कत्तलखाने बंद ठेवले जात होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातले सर्व कत्तलखाने आज महावीर जयंतीला सुरू राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीव जैन संघटननं हे आवाहन केलंय. दरम्यान मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतला देवनार कत्तलखाना बंद ठेवला आहे. मात्र राज्यातले कत्तलखाने आज सुरु राहणार आहेत.