दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे दरवाजे पुन्हा उघडणार

दोन वर्षाच्या मोठ्या विलंबानंतर अखेर विलेपार्ले इथलं दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह पार्लेकरांच्या सेवेत 1 ऑगस्ट पासून रुजु होतंय.

Updated: Jul 5, 2014, 09:26 PM IST
दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे दरवाजे पुन्हा उघडणार title=

विलेपार्ले : दोन वर्षाच्या मोठ्या विलंबानंतर अखेर विलेपार्ले इथलं दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह पार्लेकरांच्या सेवेत 1 ऑगस्ट पासून रुजु होतंय. 

नाटकवेड्यांचं बहुप्रतिक्षित असं हे स्वप्न पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे, याबाबतची घोषणा मुंबईचे महापौर सुनिल प्रभू यांनी शनिवारी केली. ते दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहच्या पाहणीसाठी आले होते.

प्रशांत दामले, अशोक हांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर, दिगंबर नाईक यांसारख्या अनेक कलाकारांच्या पुढाकारामुळे अखेर मुंबई महानगर पालिकेला याची दखल घ्यावी लागली. याचबरोबर मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहचाही प्रश्न लवकरच सुटेल, असं आश्वासनही सुनिल प्रभु यांनी या वेळी दिलं.

गेल्या दोन वर्षांपासून नुतनीकरणासाठी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह बंद होतं. या कामासाठी 10 कोटी रुपये निधीही मंजूर झाले होते. दिनानाथ नाट्यगृह हे पश्चिम उपनगरातील कांदिवलीपासून ते मांटुगापर्यंतचे एकमेव नाट्यगृह. मागच्या वीस वर्षात दोन वेळा नूतनीकरणासाठी हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आलंय.   
    

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.