श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावण सोमवार आहे, देशभरात शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय. श्रावणातला चौथा आणि शेवटचा सोमवार या भक्तांसाठी आर्थिक संकटांपासून दूर नेणारा असतो, असं म्हटलं जातं.

Updated: Aug 24, 2015, 02:17 PM IST
श्रावण सोमवार; शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी title=

मुंबई :  आज  श्रावण सोमवार आहे, देशभरात शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय. श्रावणा सोमवार हा भक्तांसाठी संकटांपासून दूर नेणारा असतो, असं म्हटलं जातं.

या दिवशी भक्तीने पुजा केल्यास शत्रुंवर विजय प्राप्त करता येतो. आपल्या कार्यक्षेत्रात आणि जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करता येते. कुटुंबात प्रेम आणि सहयोग वाढतो. आर्थिक संकटही कमी होतात, जीवनात येणाऱ्या संकटांसमोर लढण्याची प्रेरणा भगवान शिवशंकर देतात, असंही म्हटलं जातं.

श्रावणातल्या या सोमवारी देशभरातील मंदिरात शेवटच्या रूद्राभिषेकसाठी विशेष आयोजन केलं जातं. नवी दिल्ली, देवघक, पाटणा, लखनौमध्येही मंदिरात भोलेनाथसाठी मोठ्या रांगा लागतात. हरहर महादेव, बम-भोलेचा नाद सर्वत्र ऐकायला येतो. मंदिरातील गर्दी पाहून खास सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

शिवपुजेनंतर सर्व इच्छा पूर्ण होतात,  सोमवारी दूध, दही, बेलपत्र वाहण्यास विशेष महत्व आहे, साखरेने शिवपूजा केल्याने लक्ष्मीप्राप्ती होते आणि मधूमेहाच्या आजाराने मुक्ती मिळते असाही समज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.