आमदार रमेश कदम यांना दणका, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना मोठा दणका बसलाय.

Updated: Mar 10, 2017, 05:10 PM IST
आमदार रमेश कदम यांना दणका, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश title=

मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना मोठा दणका बसलाय. कदम यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने दिलेत. त्यानुसार त्यांची एकूण 136 कोटी रुपयांची मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आलेत.

कदम यांच्या शेती, प्लॉट्स, औरंगाबाद इथली मालमत्ता, 20-25 बँक अकाऊंट्स, अशा एकूण 54 मालमत्ता जप्त करण्यात आल्यात. न्यायमूर्ती टंकीवाला यांनी हे आदेश दिलेत. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी सध्या रमेश कदम अटकेत असून त्यांनी चारशे कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा केल्याचं बोललं जातंय.