मुंबई विधानपरिषदेच्या जागांवर कदम आणि जगताप!

. चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाई जगताप यांचा निसटता विजय झालाय. त्यांनी अवघ्या २ मतांनी प्रसाद लाड यांचा पराभव केलाय.

Updated: Dec 30, 2015, 09:22 AM IST
मुंबई विधानपरिषदेच्या जागांवर कदम आणि जगताप! title=

मुंबई : मुंबई विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाई जगताप यांचा निसटता विजय झालाय. त्यांनी अवघ्या २ मतांनी प्रसाद लाड यांचा पराभव केलाय. तर शिवसेनेचे रामदास कदम यांना सहज विजय मिळालाय.

विधानपरिषदेच्या मुंबईच्या निवडणुकीत रामदास कदम आणि भाई जगताप विजयी झालेत. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या जागेच्या निकालात भाई जगताप यांचा निसटता विजय झाला. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या प्रसाद लाड यांना ५६ मतं मिळाली तर भाई जगताप यांना ५८ मतं मिळाली. 

अपेक्षेप्रमाणे मुंबई पालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेचे उमेदवार रामदास कदम यांना ८६ मतं मिळाली.

'राष्ट्रवादी'च्या लाडांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!
विशेष म्हणजे पराभव झाल्यावर पराभव मोठ्या मनाने स्वीकार करतो, असं म्हणतानाच प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत. त्यामुळे भाजपची पहिल्या पसंतीची मतं लाड यांच्या पारड्यात पडल्याचं स्पष्ट होतंय. 

मतदानाच्या दिवशी भाजप-शिवसेनेच्या मतदारांमधल्या दुराव्याच्या बातम्या सर्वत्र प्रामुख्यानं आल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर लाड यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जातेय.