मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. ईडीमधल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
तब्बल 10 तास छगन भुजबळ यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून छगन भुजबळ यांना काही प्रश्न विचारण्यात आले, पण त्याची समाधानकारक उत्तरं त्यांना देता न आल्यामुळे भुजबळांना अटक करण्यात आली, अशी माहिती मिळत आहे.
उद्या सकाळी 11 वाजता इडीच्या स्पेशल कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. दरम्यान भुजबळ यांना अटक करण्याच्या आधी विधानसभेच्या सभापतींची परवानगीही घेण्यात आल्याचं समजत आहे.
दरम्यान छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भुजबळांनंतर आता अजित पवार आणि सुनिल तटकरेंचा नंबर असल्याचं वक्तव्य भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर भुजबळांना अटक झाल्यानं भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी आशेचा किरण उत्पन्न झाला आहे अशी प्रतिक्रिया आप च्या नेत्या अंजली दमानिया यांनी दिली आहे.