उमेदवारांचा आता मतदारांशी व्यक्तिगत भेटीगाठींवर भर

Updated: Feb 20, 2017, 09:37 AM IST
उमेदवारांचा आता मतदारांशी व्यक्तिगत भेटीगाठींवर भर title=

मुंबई ; राज्यातल्या मुंबईसह दहा महापालिका, 11 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. महिन्याभरापासून सुरु असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांची एकमेकांवरची चिखलफेक आता थांबली आहे.

जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आता उमेदवारांचा मतदारांशी व्यक्तीगत भेटीगाठींवर भर असणार आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अमरावती, अकोला आणि नागपूर महापालिका निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 67 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 134 गणांसाठी उद्या मतदान सकाळी साडेसात ते साडे पाचच्या दरम्यान होणार असून विविध पक्ष,आघाड्या आणि अपक्ष असे 905 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणुकीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली.

आज यंत्रणेतील सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन साहित्यासह दुपारी मतदान केंद्रावर पाठवलं जाईल. गुरूवारी 23 तारखेला तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.