मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील दक्षिणेकडील बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एक जवळील सबवे सोमवार दि. 29 ऑगस्टपासून सुमारे तीन महिने बंद करण्यात येणार आहे.
बोरीवली स्टेशनच्या पश्चिम बाजुला एलिवेटेड बसविण्यात येणार आहे. याच्या कामासाठी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एक जवळील सबवे सोमवार दि. 29 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे प्रवाशांनी बोरीवली स्टेशनच्या उत्ररेकडील पादचारी पुलाचा तसेच दक्षिणेकडील नव्या पादचारी पुलाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.