ड्रग्सच्या धंद्यात बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचा वापर

मुबंई पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. ड्रग्सचा धंदा करणाऱ्यांचे जेव्हा फोन टॅप करण्यात आले तेव्हा मुंबई पोलिसांना ही माहिती मिळाली. मुंबई पोलिसांना या धंद्यात वापरल्या जाणाऱ्या अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा केला आहे.

Updated: Jan 3, 2017, 07:05 AM IST
ड्रग्सच्या धंद्यात बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचा वापर title=

मुंबई : मुबंई पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. ड्रग्सचा धंदा करणाऱ्यांचे जेव्हा फोन टॅप करण्यात आले तेव्हा मुंबई पोलिसांना ही माहिती मिळाली. मुंबई पोलिसांना या धंद्यात वापरल्या जाणाऱ्या अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री आलिया भट, बॉलिवूड क्वीन कंगना रणावत, कॅटरीना कैफ यांच्या नावाचा या धंद्यात कोडवर्ड म्हणून वापर होत आहे, रणबीर आणि रणवीर यांच्या नावाचा देखील वापर केला जात आहे.

आलिया भट्टचं नाव कोकीनसाठी, कंगना राणावतचं नाव अफीम, कॅटरीनाचं नाव स्मॅक, प्रियंका चौपडाचं नाव एलएसडी आणि हशीशसाठी अनुष्का शर्माचं नाव वापरलं जात होतं. रनवीर सिंह पेडलर आणि स्मगलर्सच्या भाषेत रणबीर कपूर म्हणजे होस्ट होता. अशा प्रकारे कोडवर्डच्या नावाच्या वापर करुन हा धंदा सुरु होता.