भाजप सरकारकडून लोकशाहीचा खून - राधाकृष्ण विखे-पाटील

विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचे निलबंन केल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झालेत.विरोधी पक्षांच्या आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सरकारवर टीका केलीय. भाजप सरकारने लोकशाहीचा खून केल्याची टीका त्यांनी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 22, 2017, 11:34 AM IST
भाजप सरकारकडून लोकशाहीचा खून - राधाकृष्ण विखे-पाटील title=

मुंबई : विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचे निलबंन केल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झालेत.विरोधी पक्षांच्या आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सरकारवर टीका केलीय. भाजप सरकारने लोकशाहीचा खून केल्याची टीका त्यांनी केली.

अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकरी कर्जमाफीवरुन विधीमंडळात गदारोळ घालणा-या विरोधी पक्षातील एकूण 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. राज्याच्या विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरु आहे. विधीमंडळच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली. गेल्या 9 दिवसांत कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात फारसं कामकाज झालेले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांना आज 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणालेत. यावेळी विरोधकांनी राज्य सरकावर जोरदार टीका केली. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घालत विधानसभेतून सभात्याग केला.