संतप्त प्रवाशांचा मुंबई बेस्टला दणका, बसच रोखली

बेस्ट प्रशासनाच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरोधात आज सकाळी प्रवाशांनी आवाज उठवत महेश्वरी उद्यान स्थानकात बस रोखून धरल्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 1, 2013, 12:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बेस्ट प्रशासनाच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरोधात आज सकाळी प्रवाशांनी आवाज उठवत माहेश्वरी उद्यान स्थानकात बस रोखून धरल्या.
एएस १३ ही ठाणे ते बॅक बे आणि ५९२ नंबरची कौपरखेरणे ते ताडदेव मार्गावर धावणा-या एसी बसेस आजपासून माहेश्वरी उद्यानपर्यंतच धावतील असा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. माहेश्वरी उद्यानला उतरुन प्रवाशांना पुन्हा बँके बे आणि ताडदेवला जाणारी दुसरी बस पकडावी लागणार आहे.
या निर्णयाविरोधात या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांनी संतप्त आंदोलन केले. प्रवाशांनी यासंदर्भात वारंवार पत्र लिहूनही बेस्ट प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक झाला. आम्ही बसने नेहमी प्रवास करीत असतो. मात्र, बेस्ट प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आम्हाला त्रास का, असा सवालही प्रवाशांनी यावेळी उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ