बीडीडी चाळीच्या रहिवाशांना मिळणार 500 स्क्वे. फुटांचे घर

बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने आराखडा मंजूर केला असून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात आली आहे. 

Updated: Sep 19, 2016, 09:15 PM IST
बीडीडी चाळीच्या रहिवाशांना मिळणार 500 स्क्वे. फुटांचे घर title=

मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने आराखडा मंजूर केला असून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात आली आहे. 

या आराखड्यावर मुख्यमंत्री अंतिम शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील इमारतींबाबतचा हा आराखडा आहे. 

या आराखड्यानुसार बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना प्रत्येकी 500 स्क्वे फुटांचे घर मिळणार आहे. म्हाडामार्फत या चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. वरळीबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही, काही कायदेशीर अडचणी आहेत. शिवड़ी बीडीडी चाळीची जागा बीपीटीची असल्यामुळं याबाबत बीपीटी निर्णय घेणार आहे.