मुंबई: मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज... खेरवाडीच्या दुसऱ्या उड्डाणपूलाचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यामुळं पश्चिम द्रुतगती मार्गावरील खेरवाडी जंक्शन पार करतांना आता सिग्नलमुळं थांबावं लागणार नाही. त्यामुळे खेरवाडी ते दहिसर असा प्रवास सिग्नलशिवाय उड्डाणपूलावरुन वेगवान होणार आहे.
त्याचबरोबर पूर्वद्रुतगती मार्गावरुन थेट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीला जोड़णाऱ्या १.६ किमी लांबीच्या उड्डाणपूलाचं भूमिपूजन करण्यात आलं. या उड्डाणपूलाचं काम ३ वर्षात पूर्ण केलं जाणार असून यामुळं अवघ्या दीड मिनिटांत बीकेसीला पोहचणं शक्य असल्याचा दावा एमएमआरडीएनं केला आहे.
दरम्यान कॅगनं आपल्या अहवालात मोनो रेल्वेवर ओढलेले ताशोरे लक्षात घेता पुढील प्रकल्पांची अंमलबजावणी करतांना काळजी घेतली जाईल, लक्ष घातलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.