संता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार?

संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.

Updated: Oct 31, 2015, 05:19 PM IST
संता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार? title=

मुंबई : संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.

कारण, संताबंताच्या जोक्सवर बंदी घालावी, अशी याचिका चक्क सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. हे जोक्स शीख समुदायाचा अवमान करणारे असून, ते बदनामीकारक आहेत. त्यामुळं त्यावर तत्काळ बंदी घालावी, अशी जनहित याचिका एका महिला वकिलानं दाखल केलीय. 

येत्या शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या कोर्टात याबाबतची सुनावणी होणार आहे. 

सध्या इंटरनेटवर पाच हजाराहून अधिक वेबसाइट्सवर संताबंताचे जोक्स दाखवले जातात. त्या माध्यमातून सरदारजींची म्हणजे शीख समुदायाची खिल्ली उडवली जाते, असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.