सोन्याच्या दरात आणखी घसरण

सोन्याच्या दरात सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरु आहे.  देशांतर्गत आघाडीवर रुपयाचे मूल्य वधारले आहे, म्हणून स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. 

Updated: Jul 18, 2015, 08:25 PM IST
सोन्याच्या दरात आणखी घसरण title=

मुंबई : सोन्याच्या दरात सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरु आहे.  देशांतर्गत आघाडीवर रुपयाचे मूल्य वधारले आहे, म्हणून स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरसह रुपयाही मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. सध्या सोने प्रति दहा ग्रॅमसाठी २५ हजार ४९८ रुपयांवर व्यवहार करत असून भावामध्ये २७३ रुपयांनी म्हणजेच १.०७ टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. 

देशांतर्गत आघाडीवर रुपया सावरल्याने देशातील स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती आणखी कमी झाल्या आहेत. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह या वर्षी व्याजदर वाढ करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलर दिवसेंदिवस मजबूत होतो आहे. 

जसजसा डॉलर मजबूत होईल तसा सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढत जाणार आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर २५ हजारांखाली जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.