ब्रेक अपनंतर युतीत महाभारत, शेलारांकडून सेनेची कौरवांशी तुलना

युतीमध्ये ब्रेक अप झाल्यानंतरचे पडसाद भाजपच्या संकल्प मेळाव्यामध्ये उमटले.

Updated: Jan 28, 2017, 08:09 PM IST
ब्रेक अपनंतर युतीत महाभारत, शेलारांकडून सेनेची कौरवांशी तुलना  title=

मुंबई : युतीमध्ये ब्रेक अप झाल्यानंतरचे पडसाद भाजपच्या संकल्प मेळाव्यामध्ये उमटले. मुख्यमंत्र्यांबरोबरच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेची तुलना कौरवांशी केली आहे. महाभारत हे अहंकारामुळे घडलं, युद्ध टाळण्याचे प्रयत्न केले, असं शेलार म्हणाले आहेत.

या सभेमध्ये शेलारांनी शिवसेनेला कौरवांची, भाजपला पांडवांची आणि मुख्यमंत्र्यांना कृष्णाची उपमा दिली. अहंकार माजला तेव्हा तेव्हा पराभव झाला, मीच शिवभक्त म्हणणाऱ्या रावणाचाही पराभव झाल्याचं शेलारांनी शिवसेनेला सुनावलं.

आशिष शेलार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- हा राज्य स्तरीय मेळावा नाही तर बुथ प्रमुखांचा मेळावा आहे. मात्र काही लोकांना राज्य स्तरीय मेळावे या बंद ठिकाणी घ्यावा लागतात. आम्हाला राज्य स्तरीय मेळावा घ्याचा असेल तर बीकेसी मैदान लागले

- महाभारताचे युद्ध हे एकाच गोष्टीने घडले ते म्हणजे अहंकार, युद्ध टाळण्याची आवश्यकता होती तसे प्रयत्नही झाले

- आशिष शेलार यांच्याकडून शिवसेनेला कौरवांची, भाजपला पांडवांची आणि मुख्यमंत्र्यांना कृष्णाची उपमा

- जेव्हा जेव्हा अहंकार माजला तेव्हा तेव्हा पराभव झाला. मीच शिव भक्त असे म्हणणा-या रावणाचा पराभव झाला

- हम किसो को छेडंगे नही, लेकीन किसी ने छेडा तो छोडेंगे नही

- एवढी मोठी पांडव सेना असताना कौरवांचा पराभव होणार, Did You Know ही अहंकाराची भाषा

- कोणाचा तरी खून करून आपला पक्ष वाढावा ही आमची परंपरा नाही

- मुंबईशी आमचं नातं विकासाचं आहे

- शिवसेनेच्या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा उल्लेख नाही, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला