नवी मुंबई : राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांची बदली करण्यात आलीय. कमी महत्त्वाच्या आणि बंद पडलेल्या ‘महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बोर्डा’वर त्यांना पाठवण्यात आलंय.
'मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'च्या संचालक मंडळावर केलेली कारवाई सुभाष माने यांना भोवल्याचं बोललं जातंय. याविरोधात मॅटकडे दाद मागण्याची तयारी माने यांनी केलीय.
138 कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवून माने यांनी एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आदेश धुडकावून लावत बरखास्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता मानेंची बदली करण्यात आल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालयातून हालचाली सुरू असल्याची चर्चा होतेय.
काय आहे एपीएमसी घोटाळा…
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.