मुंबई : नवी मुंबईत दहिहंडी सरावादरम्यान बालगोविंदाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता 24 तास उलटलेत. यानंतर मुंबईतील जोगेश्वरी पश्चिममध्ये एका एकोणीस वर्षाच्या गोविंदाचा मृत्यू झालाय.
गणेशनगर येथे रात्री दहिहंडीचा सराव झाल्यानंतर ऋषिकेश आपल्या मित्रांशी गप्पा मारत होता. या दरन्यान त्याला चक्कर आली, त्याला कूपर रूग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.. या प्रकरणी ओशीवरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याआधी मुंबईतल्या सांताक्रूझ भागात दहिहंडीच्या सरावादरम्यान आठ गोविंदा जखमी झालेत. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. यापैकी एका गोविंदाचं वय 12 असल्याची माहिती मिळतीय.
उंचच उंच थरांसाठी मोठी बक्षीसे ठेवणारे नेते त्यांच्या 12, 15 वर्षांच्या मुलाला 9 वा, 10 वा थर चढवण्याचे धारिष्ट्य दाखवणार का ? ही कृष्णाष्टमी म्हणायची की कंसाष्टमी म्हणायची, असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.