स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना

स्वाईन फ्ल्यूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या. तसेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Updated: Apr 16, 2017, 08:35 AM IST
स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना title=

मुंबई : स्वाईन फ्ल्यूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या. तसेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्य भवन येथून राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. दरम्यान स्वाईन फ्ल्यूसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला.