करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध मावळल्यानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. त्यातच मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आणि मनसेनं टाकलेली नांगी हा चर्चेचा विषय बनलाय.

Updated: Oct 22, 2016, 01:32 PM IST
करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या! title=

मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध मावळल्यानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. त्यातच मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आणि मनसेनं टाकलेली नांगी हा चर्चेचा विषय बनलाय.

यानंतर काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत...

- सीमेवर पाकिस्तानी अतिरेक्यांशी लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे आणि करण जोहर यांच्यात झालेले 'डील' पटणार का? 

- पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग असलेल्या चित्रपटाचा पैसा 'आर्मी वेलफेयर फंड' घेणार का? 

- मुख्यमंत्र्यांना भारतीय चित्रपटांत पाक कलाकारांचा सहभाग मान्य? 

- पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी नांगी का टाकली?

- 'ऐ दिल है मुश्किल'ला विरोधामागे फक्त सिनेनिर्मात्यांनी गुडघे टेकणे एवढाच उद्देश् होता का? 

- या सगळ्या नाट्यात सरशी कोणाची झाली? भूमिकेवर घुमजाव करणाऱ्या राज ठाकरे यांची? यशस्वी मध्यस्थी केलेल्या मुख्यमंत्र्यांची? की ठरल्या तारखेला चित्रपट प्रदर्शित करणार ही भूमिका घेतलेल्या करण जोहरची?

- राज ठाकरेंना आपल्या मर्यादा समजू लागल्या आहेत... जर विरोध करूनही पोलिसांच्या सुरक्षतेत चित्रपट प्रदर्शित झाला असता तर निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे हसे झालं असतं. ज्याची भीती राज ठाकरेंना सर्वाधिक होती. त्यामुळंच त्यांनी माघार घेतली का?

- या वादामुळे फुकटची पब्लिसिटी मिळून 'ऐ दिल है मुश्किल'चाच फायदा झाला का?

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यामध्ये असमर्थ ठरलेले मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात तोडपाणी झालंय, तसंच राजकीय गुंडगिरीसमोर मु्ख्यमंत्री झुकल्याचा आरोपही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.