आधार कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांना `आधारच नाही`

मुंबईतील आधार कार्ड काढण्यासाठी जाणा-या अनेक जेष्ठ नागरिकांना सध्या त्रासाला सामोरं जावं लागतंय... अनेक ठिकाणी जेष्ठ नागरीकांच्या बोटांचे ठसे एनरॉलमेंट मशीनवर उमटतच नाहीत...

Updated: Feb 6, 2013, 10:54 AM IST

www.24taas.com, पंकज दळवी, मुंबई
मुंबईतील आधार कार्ड काढण्यासाठी जाणा-या अनेक जेष्ठ नागरिकांना सध्या त्रासाला सामोरं जावं लागतंय... अनेक ठिकाणी जेष्ठ नागरीकांच्या बोटांचे ठसे एनरॉलमेंट मशीनवर उमटतच नाहीत... पेन्शनसाठी हे कार्ड अनिवार्य होणार असल्यानं आता कुणाचा आधार असा सवाल ज्येष्ठ नागरिक विचारत आहेत... जेष्ठ नागरिकांच्या बोटाचे ठसे एनरॉलमेंट मशीनवर उमटतच नसल्याने आता अनेकांना त्याचा त्रास होतोय. त्यामुळं आधारकार्ड काढणाऱ्यांना ऑपरेटर थेट घरचा रस्ता दाखवतात, आणि नंतर येण्यास सांगतात.

मुंबईतल्या अनेक जेष्ठ नागरीकांना अशाच त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. अनेक ठिकाणी जेष्ठ नागरीकांच्या बोटांचे ठसे एनरॉलमेंट मशीनवर उमटत नाहीत... जेष्ठ नागरीकांच्या पेन्शनसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार आहे.. त्यामुळं जेष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. दुसरीकडे या अडचणीवर तोडगा काढला असून ऑपरेटर्सच्या अज्ञानामुळं काही ठिकाणी हे प्रकार घडत असल्याचं युआयडीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे.

सध्या मुंबईतील आधार केंद्रांवर सध्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. त्यातच वाढत्या गर्दीमुळे यंत्रणाही कोलमडल्याच्या घटना घडत आहेत. युआयडीचे अधिकारी सारं काही आलबेल असल्याच्या आविर्भावात बोलत आहेत.. मात्र यांत हाल होतात ते ज्येष्ठ नागरिकांचे. दाद मागावी तरी कुणाकडं असा प्रश्न त्यांना पडला आहे.