ईस्टर्न फ्रिवेवर अपघात, २ ठार

मुंबईतील ईस्टर्न फ्रिवेवर  ऑडी आणि टॅक्सीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार आणि दोघे जखमी झाले.  हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jun 9, 2015, 11:56 AM IST
ईस्टर्न फ्रिवेवर अपघात, २ ठार title=

मुंबई : मुंबईतील ईस्टर्न फ्रिवेवर  ऑडी आणि टॅक्सीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार आणि दोघे जखमी झाले.  हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झाल्याचं सांगण्यात येत आहे.

ईस्टर्न फ्रिवेवर चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या ऑडीने टॅक्सीला धडक दिली. पोलिसांनी ऑडीचालक महिलेला अटक केली आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑडीचालक जान्हवी गडकर या वकील आहेत.

जान्हवी गडकर यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.