www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतात मुंबई हे आता राहण्यासाठी सगळ्यात चांगले शहर मानले आहे. इन्स्टिट्युट फॉर कॉम्पिटेटिव्हनेस इंडियातर्फे दरवर्षी देशातील प्रमुख शहरांचा अभ्यास करून `लिव्हेबिलिटी इंडेक्स` जाहीर केला जातो. `एलआय` मध्ये आधी हा मान नागपूरला मिळाला होता. पण आता मात्र या शर्यतीत मुंबईचा नंबर हा पहिला लागला आहे.
या वर्षीच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या चार शहरांचा समावेश आहे. या यादीत नाव मिळवण्यासाठी शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधांचा दर्जा, सुरक्षा, गृह पर्याय, सामाजिक-सांस्कृतिक वातावरण, आर्थिक, पर्यावरण स्थिती यांचा विचार केला जातो. शहरी व ग्रामीण भागही विचारात घेतला जातो. तसेच पायाभूत सुविधा आणि एकूण विकासही लक्षात घेतला जातो.
मुंबईत राहणीमान चांगले आहे. अनेक परदेशी पर्यटक दरवर्षी चांगल्या संख्येने मुंबईला भेट देतात. तसेच मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप, उच्चप्रतीचे शिक्षण देणाऱ्या संस्था, आरोग्य संस्थांची उपलब्धता, नागरिकांची सुरक्षा, प्रशासन उत्तम असल्याने, मुंबईला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. तसेच यंदाच्या यादीत मुंबईसह चेन्नई आणि हैदराबाद यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.