www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २० मिनिटांपासून ठप्प आहे. त्यामुळे सीएसटी येथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. मोटरमन आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील वादामुळे रेल्वे ठप्प होती. ही वाहतूक ४५ मिनिटानंतर सुरू झालेय. मात्र, तुफान गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मोटरमन, रेल्वे प्रशासनातील वादामुळे प्रवासी वेठीला धरले गेले आहेत. सीएसटी रेल्वे स्थानकावर गोंधळ निर्माण झाल्याने नक्की काय चालले आहे याची माहिती मिळत नव्हती. कामावरून घरी निघालेले मुंबईकर या गोंधळामुळे त्रस्त झाले होते.
२० मिनिटांपासून मुंबई सीएसटीमधून एकही लोकल सुटली नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. हार्बर आणि मध्य मार्गावरील प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मध्य मार्गावर मज्जिद, भायखळा, परळ तर हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, कुर्ला या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे.
४५ मिनिटानंतर रेल्वे सुरू झाल्याने लोकलला प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. जवळपास ४० ते ५० मिनिटे गाड्या उशिराने सुटल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, एका मोटरमनला निलंबित करण्यात आल्याने मोटरमनच्या एका संघटनेने आंदोलन पुकारत रेल्वे प्रवाशांना वेठीस धरले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.