आबांचा अखेरचा शब्द होता आई - सुप्रिया सुळे

आबा (आर आर पाटील) आज आपल्यात नाहीत यावर खरतर अजूनही मला विश्वास बसत नाही. त्यांना दुर्दैवाने बोलता येत नसल्याने त्यांनी लिहून दाखविले. आबांनी लिहिलेला तो अखेरचा शब्द होता, तो म्हणजे आई, अशी आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी जागविली.

Updated: Feb 21, 2015, 12:34 PM IST
आबांचा अखेरचा शब्द होता आई - सुप्रिया सुळे title=

मुंबई : आबा (आर आर पाटील) आज आपल्यात नाहीत यावर खरतर अजूनही मला विश्वास बसत नाही. त्यांना दुर्दैवाने बोलता येत नसल्याने त्यांनी लिहून दाखविले. आबांनी लिहिलेला तो अखेरचा शब्द होता, तो म्हणजे आई, अशी आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी जागविली.

मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय शोकसभेत उपस्थित सर्वांनी आबांच्या आठवणी जागविल्या त्यावेळी याचा प्रत्यय आला. आबांच्या आजारपणात मी नियमित हॉस्पिटलमध्ये जाऊन आबा आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत असे. शेवटच्या काही दिवसात आबांना बोलता येत नव्हते तरी ते लिहून माझी विचारपूस करायचे, असे सुप्रिया म्हणाल्यात. 

चहा घेतला का असे विचारायचे. आबा तुम्ही लवकर बरे व्हा, आपण बरोबर बसून चहा घेऊ असं म्हटले की, ते मिश्कील हसायचे. आबांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा मी तिथे उपस्थित होते. आयुष्यात कधीही ही गोष्ट मी विसरू शकणार नाही. अत्यंत दु:खदायक प्रसंग माझ्यासाठी होता तो, असे त्या म्हणाल्या.

आबांच्या आईंना मी त्यांना भेटायला घेऊन जायचे. आबांना आम्ही सगळेजण धीर द्यायचो. आम्ही आईंसोबत आहोत तुम्ही काळजी करू नका, असे सांगायचो. त्यांना बोलता येत नसल्याने त्यांनी लिहून दाखविले. आबांनी लिहिलेला तो अखेरचा शब्द होता तो म्हणजे आई, असे त्यांनी सांगितले.

आबा आमच्यात नाही, यावर विश्वास नाही. ते छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत असत. त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. हे त्यांच्या लक्षात होते. त्यांनी नर्सला सांगितले माझ्याकडे आता पैसे नाहीत. तू तिला कॅटबरी घेऊन दे. मी बरा झालो की, तुला तुझे पैसे परत करीन, असे नर्स सांगितले. आबांनी आपल्या मुलीला असे बर्थडे गिफ्ट दिले.

आज आबा आपल्यात नाही. मात्र, यापुढे तंबाखू तसेच अन्य पदार्थाने कॅन्सर होतो. त्याबाबत जनजागृतीसाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. पक्ष यापुढे याबाबत पुढाकार घेणार आहे. पुढील पिढीला तंबाखू सारखे व्यसन जडू नये म्हणून आम्ही पक्षाच्यावतीने मोहीम राबविणार आहे. सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.