लवकरच मुंबईकरांची वाहतूक बोगद्यातून

मुंबईत सध्या 22 किमी लांबीचा " ईस्टर्न फ्री वे " चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सीएसटी-वडाळा-आणिक-पांजारपोळ-घाटकोपर असा फ्रीवेचा मार्ग असेल. यापैकी 9 किमीचा मार्ग उन्नत असेल तर 500 मीटरचे लांबीचे दोन बोगदे असणार आहेत.

Updated: Apr 23, 2012, 06:23 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत सध्या 22 किमी लांबीचा " ईस्टर्न फ्री वे " चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सीएसटी-वडाळा-आणिक-पांजारपोळ-घाटकोपर असा फ्रीवेचा मार्ग असेल. यापैकी 9 किमीचा मार्ग उन्नत असेल तर 500 मीटरचे लांबीचे दोन बोगदे असणार आहेत. तेव्हा मुंबईत पहिल्यांदाच मुंबईकरांचा प्रवास हा बोगद्यातून होणार आहे.प्रत्येकी चार लेनचा रस्ता, 17 मीटर रुंद आणि 10 मीटर उंच असलेल्या या बोगद्याची कामे जोरात सुरु आहे. यापैकी एका बोगद्याचे काम 300 मीटरपर्यंत तर दुस-या बोगद्याचे काम 250 मीटरपर्यंत झालेले आहे. तयार झालेल्या बोगद्यातील  भागावरसुद्धा शेवटचा हात फिरवला जात आहे.

 

आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी बोगद्यातून रस्ता हा प्रकार नवीनच आहे.  मात्र न्यूयॉर्कमध्ये तब्बल 50 किमीचे रस्ते हे बोगद्यातून आहेत. सिडनीमध्ये साधारण 3 किमीचे रस्ते आहे, तर जयपूरमध्येही 600 मीटरचा बोगदा रस्ते वाहतूकीसाठी बांधला जात आहे.

 

मुंबईतील ईस्टर्न फ्री वे च्या कामामध्ये आता परवनगीचा कुठलाही अडथळा राहिलेला नाही. त्यामुळे सर्व काही सुरळीत सुरु राहिले तर 2012 च्या अखेरीस मुंबईकरांचा प्रवास या बोगद्यातून, या नव्या मार्गावरुन करता येईल.