मुंबईत २५% पाणी कपात

मुंबईकरांसाठी हा विकेंड पाणीकपातीचा असणार आहे. मध्य वैतरणा प्रकल्पाचे जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईच्या कुलाबा, मलबार हिल, भेंडीबाजार, नळबाजार, माझगाव, खार, माहीम, वरळी आणि दादर या भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी २५ टक्के पाणीकपात होणार आहे.

Updated: Jan 5, 2012, 09:49 AM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईकरांसाठी हा विकेंड पाणीकपातीचा असणार आहे. मध्य वैतरणा प्रकल्पाचे जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईच्या कुलाबा, मलबार हिल, भेंडीबाजार, नळबाजार, माझगाव, खार, माहीम, वरळी आणि दादर या भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी २५ टक्के पाणीकपात होणार आहे.

शहापूरमधील अघाई आणि मोहिली या गावांदरम्यान वैतरणा ही मुख्य वाहिनी मध्य वैतरणाला जोडायचं काम केलं जाणार आहे. हे काम ६ जानेवारी म्हणजेच शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापास्नं सुरू होईल. वैतरणा या मुख्य जलवाहिनीला मध्य वैतरणा जलवाहिनीस दोन ठिकाणी जोडणीचे काम ६ जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल. ८ जानेवारीला पहाटे दोन वाजता काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे या काळात संपूर्ण पश्चिम उपनगर व शहर विभागात २५ टक्के पाणी कपात करण्यात येईल.