...तर मी राजकारण सोडीन- भुजबळ

भुजबळ नॉलेजसिटी आणि मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या कामकाजाबाबत मी दोषी आढळलो तर राजकारण सोडीन, असा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे. मला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोपही भुजबळांनी केला आहे.

Updated: May 1, 2012, 10:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

भुजबळ नॉलेजसिटी आणि मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या कामकाजाबाबत मी दोषी आढळलो तर राजकारण सोडीन, असा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे. मला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोपही भुजबळांनी केला आहे.

आपल्या राजकीय कारकिर्दीवर हल्ला चढविण्याचं षडयंत्र काही गटांकडून रचलं जातं आहे, असंही भुजबळ म्हणाले. विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारल्याने हायकोर्टानं भुजबळांना नोटीस पाठविल्याची चर्चा आहे.

पण अशा प्रकारची कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. आपल्याभोवती राजकीय षडयंत्र रचलं जात असून यातून बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.