जड वाहनांवर आता 'वेग नियंत्रक' सक्तीचा

राज्यातील रस्त्यांवरली अपघातांचे प्रमाण लक्षात घेता विविध वाहनांवर " वेग नियंत्रक " बसवण्याचा निर्णय घेण्यात परिवहन विभागाने घेतला आहे. 1 मे पासून पुढील चार महिन्यात राज्यातील सर्व स्कुल बसवर 'वेग नियंत्रक' सक्तीचा केला जाणार आहे

Updated: Apr 25, 2012, 05:39 PM IST

अमित जोशी, www.24taas.com, मुंबई

 

राज्यातील रस्त्यांवरली अपघातांचे प्रमाण लक्षात घेता विविध वाहनांवर " वेग नियंत्रक " बसवण्याचा निर्णय घेण्यात परिवहन विभागाने घेतला आहे. 1 मे पासून पुढील चार महिन्यात राज्यातील सर्व स्कुल बसवर 'वेग नियंत्रक' सक्तीचा केला जाणार आहे. त्यानंतर डंपर, टॅकर, खाजगी बस आणि आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या जड वाहनांवर हा नियंत्रक सक्तीचा असेल.

 

राज्यातील रस्त्यांवरली अपघातांची संख्या लक्षात घेता जड वाहनांच्या वेगाला नियंत्रण घालाणार वेग नियंत्रक बसवला जाणार आहे. राज्यात दरवर्षी सुमारे 70,000 रस्ते अपघात होतात. सरासरी 10,000 पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी तर 50,000 पेक्षा जास्त जखमी होतात. बेदरकारपणे वाहने चालवणे हे यामागचे मुख्य कारण आहे. जड वाहनांचा या अपघातांमध्ये प्रामुख्याने समावेश असतो. म्हणूनच जड वाहनांच्या वेगाला वेसण घालण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी 1 मेपासून स्कुल बस, 1 जुलैपासून टँकर आणि डंपर, 1 सप्टेंबरपासून खाजगी बस आणि 1 नोव्हेंबरपासून आंतरराज्य वाहतूक करणारी जड वाहने यांवर " वेग नियंत्रक " सक्तीचा केला जाणार आहे.

 

पुढील वर्षाच्या अखेरीस वेग नियंत्रक बसवण्याची सर्व कामे पुर्ण होतील अशी अपेक्षा आहे. राज्य परिवहन महामंडळच्या गाड्या, महापालिकांच्या परिवनहन सेवा यांना यामधून वगळले आहे. त्यामुळे खाजगी बस मालकांकडून वेग नियंत्रकाला विशेष विरोध होण्याची शक्यता आहे.