कृपा वाढदिवसात, काँग्रेस पाठीशी घालतेय का?

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले कृपाशंकर सिंह मुंबईत उजळ माथ्यानं फिरत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांच्या वाढदिवसालाही कृपाशंकर सिंह यांनी हजेरी लावली.

Updated: Mar 4, 2012, 11:34 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले कृपाशंकर सिंह मुंबईत उजळ माथ्यानं फिरत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांच्या वाढदिवसालाही कृपाशंकर सिंह यांनी हजेरी लावली.

 

कृपाशंकर सिंहांवर गुन्हा दाखल झालेला आहे. एसआयटीनं त्यांचा जबाबही नोंदवून घेतला आहे. मात्र काँग्रेसनं अजूनही त्यांना अंतर दिलेलं नाही. गुन्हा दाखल झाला असला तरी काँग्रेसची कृपाशंकर सिंह यांच्यावर मर्जी कायम असल्याचंच यातून दिसून येतं आहे. महादेव शेलार हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातले मानले जातात.

 

कृपाशंकर सिंह यांना अजूनही काँग्रेस पाठीशी घालत आहे. काँग्रेसने कृपाशंकर यांना अजूनही दोषी मानलेले नाही. असं दिसून येतं त्यामुळे काँग्रेस कृपाशंकर यांच्यावर काय कारवाई करणार की नाही हे मात्र कोडंच आहे.