www.24taas.com, मुंबई
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हायकोर्टानं मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. तसंच कृपाशंकर सिंह यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचेही निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. त्यामुळं कृपाशंकर सिंह चांगलेच अडचणीत आले आहेत.
काय आहे प्रकरण
- कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे एकत्रित उत्पन्न 69 लाख 94 हजार 258 रुपये
- कृपाशंकर यांचे 18 बँकांमध्ये 100 कोटीपर्यंत व्यवहार
- 16 वर्षांत कृपाशंकर सिंहांच्या उत्पन्नात अचाट वाढ
- 2009 मध्ये कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्रमोहन सिंह याला डी.बी. रियाल्टीकडून साडे चार कोटी मिळाले.
- शाहीद बल्वाच्या कंपनीकडून तीन हप्त्यांमध्ये हे पैसे नरेंद्रमोहन सिंह याच्या खात्यात जमा झाले.
- झारखंडचे खाण घोटाळा फेम मुख्यमंत्र्यांचे सहकारी कमलेश सिंह यांच्या मुलीबरोबर नरेंद्रमोहन सिंहांचे लग्न
- नरेंद्रमोहनच्या लग्नासाठी सिंह कुटुंबीयांचं व-हाड नऊ विमानांनी रांचीला गेलं
[jwplayer mediaid="53439"]