कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता

घसरणारा रुपया आणि महागाई दरात होत असलेली घट पाहता कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.

Updated: Dec 16, 2011, 03:34 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

महागाईनं कंबरडं मोडलेल्या जनतेला आज थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. घसरणारा रुपया आणि महागाई दरात होत असलेली घट पाहता कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.

 

कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यामुळं होमलोन कमी बरोबर कर्जदारांचा ईएमआयही कमी होऊ शकतो.  रुपयातील घसरणीमुळं अनेक उद्योगांना मोठ्या तोट्यास सामोरं जावं लागतंय. त्यामुळं आता आशा टिकून आहेत, त्या आज जाहीर होत असलेल्या आरबीआयच्या तिमाही क्रेडीट पॉलिसीवर गेल्या २० महिन्यांत आरबीआयनं १३  वेळा कर्जावरील व्याजाच्या दरात वाढ केलीय.

 

एकीकडं दिलासा मिळत असला तरी दुसरीकडं पेट्रोलच्या दरात आज वाढ होण्याच्या शक्यतेमुळं सर्वसामान्यांना फटका बसणाराय. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानं आणि रुपयात होत असलेल्या घसरणीमुळं पेट्रोल ६५ पैशांनी महाग होऊ शकते. तेल कंपन्या यावर आज निर्णय घेऊ शकतात.