उद्धव ठाकरेंनी केलं साई सच्चरित ग्रंथाचं उद्घाटन

मुंबईतल्या वांदे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या साई सच्चरित ग्रंथ महापारायणाचं उदघाटन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. शिर्डीतल्या साईबाबा संस्थानच्या वतीनं १५ ते १८ डिसेंबर दरम्यान या महापारायणाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Updated: Dec 15, 2011, 10:35 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

मुंबईतल्या वांदे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या साई सच्चरित ग्रंथ महापारायणाचं उदघाटन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. शिर्डीतल्या साईबाबा संस्थानच्या वतीनं १५  ते १८ डिसेंबर दरम्यान या महापारायणाचं आयोजन करण्यात आलं आहे.

यानिमित्त साई भजन संध्या तसचं १५० कलाकारांचा सहभाग असलेलं श्री शिर्डी के साईबाबा हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे.

त्यामुळे साई भक्तांना या निमित्ताने श्री साई सच्चरित ग्रंथ महापारायणाचं श्रवण करण्याचं योग प्राप्त होणार आहेच, पण तसचं शिर्डीच्या साईबांबाचा महिमा असलेलं नाटक पाहणयाची संधी सुद्धा भाविकांना लाभणार आहे.