झी २४ तास वेब टीम, मुंबई
जुहूच्या ईकोल मंडळ या आयबी बोर्डाच्या शाळेनं मनमानीचा कळस गाठलाय. एका अनिवासी भारतीय पालकाकडून तब्बल २० लाख रुपये या शाळेनं उकळले. अनिवासी भारतीय असणाऱ्या शितल मेहता. त्यांनी आपल्या मुलांच्या शाळेविरोधात बंड पुकारलं. जुहूतील ईकोल मंडळ या आयबी बोर्डाच्या शाळेत मेहतांच्या दोन्ही मुली शिकतात.
यंदा शाळेच्या फीचा १० लाखांचा चेक उशिरा पोहचल्यामुळे मेहतांना न कळवताच त्यांच्या मुलींना शाळेतून काढून टाकलं. मात्र, शाळेत पुर्नप्रवेश देताना तब्बल १० लाखांचा दंड उकळला. भीतीपोटी त्यांनी हे पैसे भरले मात्र, याबाबत शाळेकडे स्पष्टीकरण विचारलं असता समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचं मेहतांचं म्हणणं आहे..
शाळेची पॉलिसी असल्याचा रुबाब आता शाळा दाखवते आहे. तरीही याचा उल्लेख कुठेही वेबसाईट, शाळेच्या माहितीपत्रकात नाही.तसंच याआधीही या शाळेनं पालकांकडून दंड म्हणून पैसे उकळले. शाळेच्या या मनमानी कारभाराविरोधात फोरम ऑफ फेअरनेस ईन एज्युकेशन ही संस्था आता कोर्टात जाणार आहे. कॅपिटेशन फी, शुल्क नियंत्रण कायदा असे कायदे असूनही अशा इंटरनॅशनल शाळांची मनमानी सुरुच असल्यामुळे पालकांना लाखोंना लुटलं जातं.