www.24taas.com, मुंबई
मंत्रालयाला लागलेली भीषण आग अजूनही अटोक्यात आलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईतील अग्निशमन दल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या आगीमुळे इमारतीचा चौथा, पाचवा आणि सहावा मजला जळून खाक आहे. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालयंही जळून खाक झाली आहेत.
तर इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी फोर्स वन आणि नौदलाची मदत घेण्यात आली आहे. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर लागलेली आग हळूहळू पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर पोहोचली. आगीत आतापर्यंत चौदा जण जखमी झाले आहेत. जखमींना जीटी, सेंट जॉर्ज या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
इमारतीच्या जळालेल्या मजल्यांवर अनेक खात्यांची कार्यालयं असल्याने महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाल्याचं कळतं. मंत्रालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसंच जे जे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, नगर विकास खात्याचे उपसचिव सुरेश कांकणी यांच्या कार्यालयातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली