मनसेची कृष्णकुंजवर 'लगीनघाई'

मुंबई महापालिका निव़डणूकीसाठी मनसेचे उमेदवार ठरवण्याचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. युती आघाडीच्या राजकारणानंतर आता साऱ्याचे लक्ष मनसेच्या यादीकडे लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी सर्व इच्छुक उमेदवारांना कृष्णकुंजवर बोलावणं धाडलं आहे.

Updated: Jan 25, 2012, 01:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिका निव़डणूकीसाठी मनसेचे उमेदवार ठरवण्याचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. युती आघाडीच्या राजकारणानंतर आता साऱ्याचे लक्ष मनसेच्या यादीकडे लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी सर्व इच्छुक उमेदवारांना कृष्णकुंजवर बोलावणं धाडलं आहे.

यासाठी सकाळपासूनच इच्छुकांच्या रांगा राज यांच्या बगंल्यासमोर लागायाला सुरुवात झाली आहे. १२०० पेक्षा जास्त उमेदवारांनी कृष्णकुंजसमोर गर्दी केली आहे. यावेळी इच्छुकांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि गर्दी यामुळे निवडणूकीचा माहोल तयार झाला आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांची निवड करताना परीक्षा घेऊन उमेदवारी नक्की करण्याची घोषणा केली होती.

तेव्हापासूनच मनसेच्या उमेदवार निवड प्रक्रीयेकडे साऱ्याचं लक्ष लागलं होतं. उमेदवारांची लेखी परीक्षा, त्यानंतर राज यानी घेतलेली सर्व उमेदवारांची भेट या दोन प्रकियेनंतर आता मनसेप्रमुखांनी पुन्हा बंगल्य़ावर बोलावल्याने इच्छुकांची एकच लगीनघाई उडाली आहे.