काँग्रेसची अजित सावंतांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई प्रदेश सरचिटणीस अजित सावंत यांच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित सावंत यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Updated: Feb 1, 2012, 11:10 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई प्रदेश सरचिटणीस अजित सावंत यांच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित सावंत यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अजित सावंत यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल असं प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं.

अजित सावंत यांनी कारवाई करण्याचा निश्चित केले असावं असं माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन जाणवत असल्याचं सांगितलं. तसंच आपल्यावर कारवाई केल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज जाईल असंही ते म्हणाले. माझ्यावर पक्षाने कारवाई केली तर तो अत्यंत दुर्दैवी निर्णय असेल. माझ्यावर कारवाई केली तरी मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतच राहीन असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि संजय निरुपमांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तिकिट वाटपात सौदेबाजी केल्याचा आरोप अजित सावंत यांनी केला होता. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संतप्त झालेल्या अजित सावंतांनी हा आरोप केला होता.