पुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

 हडपसरमधील सत्यपूरम सोसायटीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. 

Updated: Jul 26, 2016, 04:10 PM IST
पुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या title=

पुणे : शहरातील हडपसरमधील सत्यपूरम सोसायटीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मृत तरुणाचं नाव शुभम टिळेकर आहे. शुभमचे आई-वडील पुण्यात दुसऱ्या घरात गेले होते.  त्यामुळे घरात कोणी नव्हते. हे पाहून शुभमने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

दरम्यान, शुभमचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातील तणावामधून त्याने हे कृत केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, त्याने एक चिठ्ठी लिहीली असल्याचे पुढे आलेय. या प्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.