पुणे : चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविण्यास ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी नकार दिलाय.
मराठवाड्यात दुष्काळी स्थिती असताना विदेशवारी करून हार-तुरे घेणं संवेदनशील मनाला पटत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांना सविस्तर पत्र पाठवलंय.
महानोरांच्या भूमिकेमुळे आता संमेलनाच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पुढल्या महिन्यात होणा-या महामंडळाच्या बैठकीत संमेलनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
यंदा दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्गला विश्व साहित्य संमेलन घेण्याचा महामंडळाचा मानस आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.