इलेक्शन येता दारी नसलेली कामे होतात भारी...!

प्रशस्त आणि चांगले रस्ते ही तर पिंपरीची खास ओळख...! पावसाळ्यात काही रस्ते खराब झाले खरे पण त्याची दुरुस्ती झाली...! असं असताना ही आता शहरात बऱ्याच भागात रस्ते चकचकीत होत आहेत, त्याला कारण आहे अर्थात निवडणुका....!

Updated: Dec 28, 2016, 08:29 PM IST
इलेक्शन येता दारी नसलेली कामे होतात भारी...! title=

कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी चिंचवड : प्रशस्त आणि चांगले रस्ते ही तर पिंपरीची खास ओळख...! पावसाळ्यात काही रस्ते खराब झाले खरे पण त्याची दुरुस्ती झाली...! असं असताना ही आता शहरात बऱ्याच भागात रस्ते चकचकीत होत आहेत, त्याला कारण आहे अर्थात निवडणुका....!

 
 पिंपरी चिंचवड च्या बहुतांश भागात सध्या रस्ते दुरुस्तीचे काम वेगात सुरु आहे.. सर्वच रस्त्यांवर डांबरीकरण करण्याचा सपाटा सुरु आहे... त्यात काय गैर असा प्रश्न तुम्हाला पडेल...! पण थांबा... जर हे रस्ते खराब नसतील आणि तरी ही त्यांची दुरुस्ती केली जात असेल तर...?  हो तसंच आहे. 
 
 सध्या शहरात बहुतांश भागातले रस्ते नव्याने झालेल्या डांबरीकरणामुळं चकचकीत होतायेत. अर्थात गरज नसताना ही काम होत असली तरी नागरिक मात्र खुश आहेत...! निवडुकीच्या निमित्ताने का होईना परत रस्ते एकदम नवे झाले तर बरंच आहे असं नागरिक सांगतायत...!