भंडारा : भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातल्या भुयार गावात दारुचं दुकान थाटण्यावरुन दोन गट पडलेत. इथल्या ग्रामपंचायतीनं काही दिवसांपूर्वी गावात दारुचं दुकान थाटण्याचा ठराव केला. गावातल्या काही महिलांचा त्याला विरोध आहे. मात्र ग्रामपंचायतीनं निर्णय बदलला नाही.
विशेष म्हणजे सरपंचपद महिलेकडे आहे. या निर्णयासाठी सरपंचांनी आणि काही सदस्यांनी दारु दुकानाच्या मालकाकडून पैसे घेतल्याचाही आरोप केला जातोय.
अखेर ज्या महिलांचा दारुच्या दुकानाला विरोध आहे, त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी महिला सरपंचांना पकडून चोप दिला. तसंच ग्रामविकास अधिकारीही महिलांच्या तावडीत सापडला. त्यालाही महिलांनी चांगलाच बदडून काढला. एवढं सगळं होऊनही पुन्हा दारुचं दुकान थाटण्याचा सुधारित ठराव करण्यात आला.