मुंबई : खासदार प्रीतम मुंडे संचालिका असलेल्या वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या रोकडप्रकरणी सीबीआयने कारवाई केली आहे.
या प्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि बीडमध्ये तब्बल 11 ठिकाणी धाडी घालण्यात आल्या असून, या प्रकरणी एका बँक मेनजरसह दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यापूर्वी वैद्यनाथ बँकेची 10 कोटींची रक्कम मुंबईत जप्त करण्यात आली होती, त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.